Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुशिलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची वैशालीताई विलासराव देशमुख यांनी घेतली भेट....




निलंगा (एल.पी.उगीले) येथे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी श्रीमती सुशिलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी अतिशय आपुलकीने सुशिलाताई यांची आस्तेवाईकपणे त्यांनी चौकशी केली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. निलंगेकर कुटूंबीया सोबतच्या अनेक जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख लातूर लोकसभा निवडणूकीच्या निमीत्ताने निलंगा येथे महीला मेळावा कार्याक्रमास गेल्या होत्या. यावेळी त्यांनी निलंगा येथील महारा्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचीटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. 

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा परीवार आणि बाभळगाव येथील विलासराव देशमुख यांच्या परीवाराचे नेहमीच कौटुंबीक पातळीवर सलोख्याचे संबंध राहीले आहेत. विलासरावजी देशमुख यांनी लातूर जिल्हयाच्या विकासासोबत शेतकरी, कष्टकरी, जनतेच्या विकासासाठी अनेक सिंचन प्रकल्प उभारणीस निलंगा तालुक्यासाठी पुढाकार घेतला. श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सुशिलाताई यांच्या सोबत झालेल्या चर्चेत अनेक आठवणींना ऊजाळा दिला. निलंगेकर परीवाराने त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. या प्रसंगी संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. सविता काळगे, सौ. स्मिता खानापूरे, डॉ. सारिका देशमुख, सुनिता आरळीकर, संगिता मोळवणे आदी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.