Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देवणी येथील निघृन खुनाच्या आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे देवणी कारवाई.

     लातूर (एल.पी.उगीले)   देवणी येथील लॉज चे मालक अशोक मनमत आप्पा लुल्ले त्यांचा खून करण्यात आला होता. यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि देवणी पोलिसांनी तपास करून आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत.

    याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे देवणी हद्दीत शिवपार्वती लॉज येथे दिनांक 26 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात आरोपीने अशोक मन्मथप्पा लुल्ले, वय 64 वर्ष, राहणार देवणी यांचा कोणीतरी अज्ञात आरोपीने निघृण खून केला होता. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 284/ 2023 कलम 302, 201 भादवी प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                 सदरच खुनाचा उलघडा व खुनातील आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (निलंगा) डॉ.नितीन कटेकर  यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले तसेच पोलिस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांचे नेतृत्वात चार पथके तयार करून खुनाच्या कारणांचा व अज्ञात मारेकऱ्याचा विविध मार्गाने शोध घेऊन तपास करण्यात येत होता. 

            सदर पथकाने संशयाच्या भोवऱ्यात येणाऱ्या अनेक संशयित व्यक्तीकडे सखोल विचारपूस करून त्यांचे जाब-जबाब नोंदविण्यात येत होते. तसेच खुनातील मयताचे नातेवाईक, मित्र तसेच व्यावसायिक संबंध असलेल्या अनेक लोकांकडे विचारपूस करण्यात येत होती. सदर पथकांनी कठोर परिश्रम घेऊन व  विविध मार्गाने चौकशी करून मिळालेल्या  तांत्रिक माहितीचे बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून सदर खुनाच्या गुन्हयातील आरोपी हा लातूर येथील खंडापूर येथे राहणारा सचिन नारायण पाटील हाच असुन त्यांनेच सदरचा खून केल्याचे निष्पन्न केले.

              अशोक मन्मथप्पा लुल्ले यांचा खून केल्यानंतर आरोपी सचिन नारायण पाटील फरार होऊन सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता. ‌सदर आरोपीच्या मागावर असलेल्या पोलीस पथकांनी सचिन पाटील यांने वास्तव्य केलेल्या विविध ठिकाणी भेटी देऊन बातमीदार तयार केले होते. तसेच सदर पथकाकडून पुणे, पनवेल, मुंबई, दौंड, कुर्डूवाडी येथे जाऊन शोध घेण्यात येत होता. दरम्यान बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून फरार आरोपी नामे 

 सचिन नारायण पाटील, (रा. खंडापूर, तालुका लातूर जिल्हा लातूर) हा नांदेड शहरात स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत असल्याचे पथकाला समजले.त्यावरून दिनांक 03/10/2023 रोजी पोलीस ठाणे देवणी चे पथक नांदेड येथे पोहोचून नमूद आरोपी सचिन पाटील यास अतिशय सीताफिने ताब्यात घेऊन पोलीस ठाणे  देवणी येथे आणण्यात आले. त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने  पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून भांडण होऊन अशोक मन्मथप्पा लुल्ले यांना मारहाण करून खून केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलीस ठाणे देवणी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

             गुन्ह्याचा पुढील तपास देवणी पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा डॉ. नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलीस अमलदार गुनाले, आगलावे, उस्तुर्गे ,कांबळे, बुजारे, डोईजोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, जमीर शेख, राजू मस्के, नकुल पाटील, सायबर सेल, लातूर येथील पोलीस निरीक्षक अशोक बेले, पोलीस अमलदार गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.