Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दापका येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार





कमालनगर (प्रतिनिधी)

 सीमा भागातील बिदर जिल्ह्यातील कमाननगर तालुक्यामधील दापका सर्कल मध्ये  दापका येथे सरकारी माध्यमिक विद्यालय या शाळेतील दहावीचा निकाल उत्कृष्ट लागल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  स्वागत गीत व मान्यवरांचा शाल ,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.  मुख्याध्यापक व भूमि विकास बँकेचे संचालक  विलास भाऊराव जाधव यांनी सांगितले की, आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, विद्यार्थी शिस्त बद्ध असल्यास अभ्यासाला वेळ लागत नाही. हा गुण विद्यार्थीवर्गाने अंगीकार केला पाहिजे, असे  संगीत. प्रमुख अतिथी रमेश पाटील  आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, विद्यार्थी हा शिस्तप्रिय आणि अभ्यासप्रिय असणे ही काळाची गरज आहे. असे त्यांनी संबोधले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश वाडीकर यांनी सांगितले, विद्यार्थी स्वतः अभ्यासमय  झाला पाहिजे. व गुणवंत विद्यार्थ्यांची सत्कार व  सन्मान करून कौतुककरून पाठ थोपटली पाहिजे.

  या वर्षीच्या  दहावीला  असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. पुढच्या वर्षी वीस पेक्षा जास्त विद्यार्थी उत्कृष्ट गुण संपादन करून  घवघवीत यश  मिळव‌ले  पाहिजेत अशी संकल्पना व्यक्त केली . अमरेश्वर बँकेचे संचालक  मारुतीराव वाडीकर यांनी स्वतः चा अनुभव सांगितले, विद्यार्थी दशेतून घरची परिस्थिती जेमतेम असताना आज संचालक पदापर्यंत पोहोचलो. खडतर प्रवास त्यांनी सांगितला. दहावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी पास होणाऱ्यांना सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस रूपात रोख  2100 रुपये ठेवण्यात आलेला आहे . माध्यमिक शाळेचे  ‌मुख्याध्यापक भानुदास वासरे यांनी यावर्षी 80 टक्के निकाल आलेला आहे, तरी पुढच्या वर्षी 90 टक्के निकाल आणण्याचा प्रयत्न करीन असे त्यांनी आश्वासन दिले.

 यात सर्व शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे ,असे मुख्याध्यापकांनी सांगितले. प्रमुख वक्ते शिवव्याख्याते श्री सिद्धेश्वर कलावती भानुदास लांडगे   आपल्या वाणीतून विद्यार्थी अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, याची सखोल माहिती दिली. विज्ञान युगात वावरत असताना मोबाईलचा वापर मोठ्या प्रमानात होत आहे. वापर कसा करावा? त्याचे फायदे आणि तोटे ह्या गोष्टीचे सखोल असं मार्गदर्शन केले.

 प्रथम आलेल्या सत्कारमूर्ती कु. महालक्ष्मी रावसाहेब विद्यार्थिनींचा सत्कार प्रकाश सदेवाड अकराशे रुपये देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कु. गायत्री गोविंदराव, कु.सुनिता नामदेव,  निहाल फिरोज, रिहान फिरोज,शुभांगी धनाजी ,मीरा मधुकर, भगवान गोविंदराव, श्रेया उमाकांत ,प्रांजली दिगंबर इ. सत्कारमूर्तींचा शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पहार घालून  त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी प्रकाश सदेवाड, योगेश पाटील, गौस शेख,भगवानराव जाधव ,राम रामगावे, राजकुमार वाडीकर, गोविंदराव पाटील, फिरोज शेख ,रावसाहेब मानकरी ,गोविंदराव ताडपले शाळेतील सहशिक्षक शिवाजी शिगरे . चन्नबसवा स्वामी ,सतीश सावळे. गुणवंत बिरादार मारुती बिरादार सहशिक्षिका अर्चना शिंदे राजश्री कदम, मंजुळा घाट पिटले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत विलासपुरे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजीव कुमार बिरादार यांनी केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.