Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भांडण सोडवायला गेलेल्या वृद्ध महिलेचा खून

 उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहरा लगत असलेल्या एका 65 वर्षीय महिलेला डोक्यात लाकडी दंडुका घालून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीला उदगीर ग्रामीण पोलिसांनी लगेच अटक केली आहे. या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, मौजे बनशेळकी येथे किराणा व्यवसाय चालउन उदरनिर्वाह करणाऱ्या लक्ष्मीबाई महादेव रोडगे (वय 45 वर्ष) यांचा भाचा श्याम संजीव आवाळे हा लक्ष्मीबाई यांना "तू इथे का राहतेस?" म्हणून सतत वाद घालायचा. दिनांक 16 जून रोजी  रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्याम संजीव आवाळे हा दारूच्या नशेत घरी येऊन लक्ष्मीबाई यांना, "तू इथे का राहतेस?" म्हणून वाद घालू लागला. दरम्यान लक्ष्मीबाईची आई कमलाबाई संग्राम आवळे या वाद मिटवण्यासाठी मध्ये आल्या असता, कमलाबाईच्या डोक्यात लाकडी दंडुका मारून तसेच लक्ष्मीबाई यांच्या गळ्याला बोचकरून आरोपीने शिवीगाळ सुरू केली. श्याम याने कमलाबाईच्या डोक्यात मारल्यामुळे, तो मार नाजूक जागेवर लागल्यामुळे त्या मयत झाल्या. याप्रकरणी लक्ष्मीबाई महादेव रोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 378/ 23 कलम 302, 323, 504 भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.